Bihar: Liquor bottles found in Vidhan Sabha; Tejaswi demands resignation of CM

दारूबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याने गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारूच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरून राजकारण रंगले असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे(Bihar: Liquor bottles found in Vidhan Sabha; Tejaswi demands resignation of CM).

    पाटणा : दारूबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याने गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारूच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरून राजकारण रंगले असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे(Bihar: Liquor bottles found in Vidhan Sabha; Tejaswi demands resignation of CM).

    दारूच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असे ते म्हणाले आहेत. विधानसभा परिसरात दारूच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले होते. तेजस्वी यादव यांनी ट्विटरला व्हीडिओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारू उपलब्ध असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

    इतक्या कडक सुरक्षेत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यानही विधानसभेत दारू मिळत असेल तर उर्वरित बिहारची फक्त कल्पना करा, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.

    नितीश कुमार यांनीदेखील हे गंभीर प्रकरण असल्याचे मान्य करताना याची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. जर अध्यक्षांनी परवानगी दिली तर आम्ही मुख्य सचिव आणि डीजीपींना याचा तपास करायला सांगू शकतो, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.

    बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरू होण्याआधीच दारूबंदीवरून राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपाचे आमदार संजय सरावगी यांच्यात वाद झाला. प्रकऱण इतके वाढले की राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने भाजपा आमदाराला शिव्या देण्यास सुरुवात केली.