पश्चिम बंगालच्या प्रचारात ‘जय श्रीराम’ आणि दुर्गा पूजा, भाजपने आळवला हिंदुत्वाचा राग

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामच्या घोषणेचा एवढा राग का येतो, असा सवाल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला. उपस्थितांनी जय श्रीरामचे नारे दिल्यानंतर भाषणच न करण्याचा ममता बॅनर्जींचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केलीय. ममता बॅनर्जींना जय श्रीरामच्या घोषणेचा एवढा राग येण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी प्रचारादरम्यान उपस्थित करत पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केलाय. 

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत यायला सुरुवात झालीय. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पश्चिम बंगालमधील मुख्य लढत असून भाजपने प्रचारात पुन्हा एकदा त्यांचे नेहमीचे अस्त्र परजायला सुरुवात केलीय.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामच्या घोषणेचा एवढा राग का येतो, असा सवाल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला. उपस्थितांनी जय श्रीरामचे नारे दिल्यानंतर भाषणच न करण्याचा ममता बॅनर्जींचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केलीय. ममता बॅनर्जींना जय श्रीरामच्या घोषणेचा एवढा राग येण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी प्रचारादरम्यान उपस्थित करत पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केलाय.

    पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेची महान परंपरा आहे. मात्र दुर्गा पूजेला बंदी करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं एकमेव राज्य असल्याचा घणाघातही रेल्वेमंत्री गोयल यांनी प्रचाराच्या भाषणात केला. देशभर दुर्गापूजेला परवानगी असताना आणि कोरोनाबाबतचे सर्व निकष पाळून ते सुरू असताना पश्चिम बंगालमध्येच केवळ दुर्गापूजेवर बंदी घातल्याप्रकरणी त्यांनी ममता बॅनर्जींंवर जोरदार टीका केलीय.

    पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या अखेर आणि पुढील महिनाभर आठ टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय. तिसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जी आतूर आहेत, तर बंगालमध्ये सत्तापालट करण्याची पूर्ण तयारी भाजपनं केलीय. यापूर्वी आलेल्या ओपिनियन पोलमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता राखण्यात यश मिळवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पंतप्रधान मोदींच्या सभांनंतर हे वातावरण बदलू शकतं, असा अंदाजही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.