उत्तर प्रदेशात भाजपा मंत्री, आमदारांच्या राजीनामा सत्रानंतर भाजपा बॅकफूटवर, आता जुन्यांपैकी केवळ १० ते १५ टक्क्यांचीच तिकिटे कापणार

उ. प्रदेश निवडणुसांठी भाजपाने राज्यात तीन सर्व्हे केले होते. यात १०० पैकी जास्त मतदारसंघात, पुन्हा जुन्याच आमदाराला तिकिट दिले तर ती जागा हरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उ. प्रदेशातील भाजपाच्या संघटनेने पहिल्यांदा १५०, नंतर ७० ते १०० आमदारांची तिकिटे कापण्याबाबत निर्णय़ निश्चित केला होता. अनेक आमदारांना तुम्ही परत निवडून येएऊ शकणार नाही, असेही संघटनेतून सांगण्यास सुरुवातही झाली होती. त्यामुळे अनेक आमदारांनी दुसऱ्या पक्षांचा पर्याय चाचपण्यास सुरुवात केली होती.

    लखनौ-  तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या राजीनाम्यांनंतर, आणि या सगळ्यांनी समजावादी पक्षाची वाट धरल्यानंतर, सत्ताधारी भाजपा बॅकफूटवर आली आहे. दिल्लीत उ. प्रदेश निवडणुकांसाठी तीन दिवस चाललेल्या तिकिट वाटपाच्या बैठकीत, भाजपाने आपल्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय़ केला असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत जुन्या आमदारांपैकी ४० ते ५० टक्के जणांची तिकिटे कापण्याच्या स्थितीत असलेली भाजपा, आता केवळ १० ते १५ टक्क्यांचीच तिकिटे कापणार आहे.

    तीन सर्वे, आमदारांच्या पराभवाची भीती

    उ. प्रदेश निवडणुसांठी भाजपाने राज्यात तीन सर्व्हे केले होते. यात १०० पैकी जास्त मतदारसंघात, पुन्हा जुन्याच आमदाराला तिकिट दिले तर ती जागा हरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उ. प्रदेशातील भाजपाच्या संघटनेने पहिल्यांदा १५०, नंतर ७० ते १०० आमदारांची तिकिटे कापण्याबाबत निर्णय़ निश्चित केला होता. अनेक आमदारांना तुम्ही परत निवडून येएऊ शकणार नाही, असेही संघटनेतून सांगण्यास सुरुवातही झाली होती. त्यामुळे अनेक आमदारांनी दुसऱ्या पक्षांचा पर्याय चाचपण्यास सुरुवात केली होती.

    मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धर्मसिंह सैनी यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही हाच प्रश्न सतावत होता. भाजपातील सीटिंग आमदार सपात गेले तर त्याचा राज्यात प्रचारावर वाईट परिणाम होईल आणि सपाला बळ मिळेल, यावर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे भाजपाचा परिवार फार फुटू नये, यासाठी जास्त तिकिटे कापण्यात येऊ नये, असा सल्ला वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे. दिल्लीत सुमारे १७२ मतदारसंघातील तिकिट वाटपाबाबत चर्चा झआली. नावेही निश्चित करण्यात आली. यात अनेक जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे समजते. आता एकूण भाजापाच्या आमदारांपैकी केवळ २५-३० जणांचीच तिकिटे कापण्यात येतील अशी माहिती आहे.