राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा निमित्ताने भाजपचे आमदार वाढवणार जनसंपर्क

या मोहिमेअंतर्गत आमदार व पदाधिका्यांना प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात दहा ते एक हजार रुपयांची देणगीजमा केली जाईल. अभियानात आमदारांच्या कामावर आरएसएस देखरेख ठेवेल.

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदत घेतली जात आहे . राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेमध्ये पक्षाच्या आमदारांना घरोघरी पाठण्याचे निर्देश आरएसएसमधील वरिष्ठांनी भाजप नेतृत्वाला दिले आहेत. मंदिरासाठी निधी उभारण्यासह आमदारांचे जनसंपर्क अभियानाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. निधी गोळा कारण्याबरोबरच आमदार सर्वसामान्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवतील.

आरएसएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भाजप आमदारांना १ते १४ जानेवारी दरम्यान आपापल्या मतदारसंघात राम मंदिरासाठी संपर्क मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत आमदार व पदाधिका्यांना प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात दहा ते एक हजार रुपयांची देणगीजमा केली जाईल. अभियानात आमदारांच्या कामावर आरएसएस देखरेख ठेवेल. या संपर्क अभियाना दरम्यान एकही घर सुटता काम नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.  या मोहिमेचा उद्देश यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार,पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय करणे हे आहे. राम मंदिराच्या नावाखाली कार्यकर्ता प्रत्येक घरात जागृत होऊ शकला तर येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.