‘इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नसल्याचा’ व्हिडीओ शेअर करत भाजपने खासदार नुसरत जहाँची घेतली फिरकी

"नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही," असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे. ममता बॅनर्जींची टक्कर यावेळी त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

    देशात कोरोनाचा कहर पुन्हा जोम धरत असतानाच दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकांमध्ये सर्व ताकदीनिशी उतरलेल्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसपक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडता नाही. नुकताच भाजपने तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची फिरकी घेतली आहे. भाजपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच यात त्यांना आपला राग आवरला जात नसल्याचेही दिसून येत आहे. एका तासापेक्षा जास्त प्रचार तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही, असे म्हणतानाचा एक व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे. लवकरच पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. यासाठी नुसरत जहाँ या एक रोड शो करत होत्या. “मी एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून प्रचार करत आहे. इतका तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही,” असं त्या या रोड शोदरम्यान व्हिडीओत बोलताना दिसत आहे. यानंतर त्या गाडीतूनही खाली उतरल्याचं दिसत आहे.

    भाजप बंगालनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत फिरकी घेतली आहे. “नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही,” असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे. ममता बॅनर्जींची टक्कर यावेळी त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २७ मार्च रोजी पार पडलं. दुसऱ्या टप्प्याचं मतदान १ एप्रिल रोजी पार पडणार आहे .