विधानसभा निवडणूक २०२२ साठी भाजपाने कसली कंबर , जेपी नड्डा यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (शनिवार) सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत भाजपाचे महासचिव सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका २०२२ मध्ये होणार आहेत. त्यामुळे भाजपाने कोव्हिड-१९ च्या काळातच आता आगामी निवडणुकीसांठी कंबर कसली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (शनिवार) सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत भाजपाचे महासचिव सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  २०२२ मध्ये कोणत्या राज्याच्या निवडणुका होणार ?

  उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहेत. परंतु याची खरी सुरूवात आतापासूनच सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी अनेक राजकीय नेते रणनिती बनवत आहेत. कोणता पक्ष आपल्याला साथ देईल? कोणत्या पक्षासोबत आपण युती करू शकतो ? अशाप्रकारचे अनेक योजना राजकीय पक्ष आणि नेते बनवत आहेत. परंतु या सर्व गोष्टी आता वेळेनुसार हळूहळू समोर येतील.

  बिहार सरकारमध्ये सत्तेत असलेल्या JDU, VIP आणि HAM सुद्धा यूपीत होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु हे सर्व पक्ष महागठबंधन करूनच मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाहीतर दुसऱ्या पक्षासोबत सुद्धा भविष्यात जाण्याचा निर्णय हे पक्ष घेऊ शकतात.

  २०२२ साली होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राज्यातील १८२ जागांवर आम आदमी पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. गुजरातमधील सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस विरुद्ध एक विश्वासार्ह पर्याय म्हणून आप समोर येईल, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी, एका पत्रकार परिषदेत आपचे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल घोषणा केली.

  बिहार विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर भाजपने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील विधानसभेच्या सर्व ११७ जागा भाजप स्वबळावर लढणार आहे. २०२२ ची विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरु केल्याचंही तरुण चुग यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या विधानसभेचा कालावधी मार्च २०२२ ला पूर्ण होणार आहे. तर उत्तर प्रदेशचा कालावधी मे पर्यंत सुरू राहणार आहे.