धक्कादायक घटना! बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…

सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याने (Boat capsizes in river) २२ जण बुडाले आहेत. स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे. ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावात घडली आहे.

    बिहारमध्ये (Bihar) होडी उलटून २२ जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना (Shocking Incident) घडली आहे. बिहारमधील मोतिहारीमध्ये (Motihari) आज (रविवार) मोठी दुर्घटना घडली आहे. सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याने (Boat capsizes in river) २२ जण बुडाले आहेत. स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे. ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावात घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, होडीमध्ये २० ते २५ जण होते. गोढिया गावात होडी बुडाली. यामुळे तिथे खळबळ उडाली. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून प्रशासन बचावकार्याला लागले आहे.