badmer accident

जोधपूर नॅशनल हायवेवर(Jodhpur National Highway) बस आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात (8 Dead In An Accident)आठ जण जिवंत जळाले आहेत.

    राजस्थान : जोधपूर नॅशनल हायवेवर(Jodhpur National Highway) बस आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात (8 Dead In An Accident)आठ जण जिवंत जळाले आहेत.(Barmer Accident) अपघातानंतर दोन्ही गाड्यांना आग (Bus And Truck Accident) लागली आणि त्या आगीत हे आठ जण जळाले आहेत. अपघात इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळा हायवेवर दूरवरुनही दिसत होत्या. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

    राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात भांडियावास गावाजवळ बुधवारी सकाळी बस आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. हायवेवरुन ट्रेलर राँग साईडने येत होता. यावेळी ट्रेलर आणि बसमध्ये जोरदार टक्कर झाली. यानंतर बसमध्ये लागलीच आग लागली. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते अशी माहिती बसमधील वाचलेल्या एका प्रवाशाने दिली आहे. बसमधून वाचलेल्या १० ते १२ प्रवाशांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तर आणखी काही जण बसमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

    दुर्घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य जोमाने सुरु आहे. या अपघातात कुणाची चूक होती ते आग आटोक्यात आल्यानंतर कळू शकेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.