
मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये लसीकरणासंदर्भात एक वेगळीच घटना घडली. येथील एका व्यक्तीने केलेली अजब मागणी ऐकून अधिकारी बुचकाळ्यात पडले. जोवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत नाहीत तोवर मी लसीचा पहिला डोस घेणार नाही, असा हट्टच या व्यक्तीने केला आहे. या प्रकरणाचा व्हीडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आम्ही या व्यक्तीची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये लसीकरणासंदर्भात एक वेगळीच घटना घडली. येथील एका व्यक्तीने केलेली अजब मागणी ऐकून अधिकारी बुचकाळ्यात पडले. जोवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत नाहीत तोवर मी लसीचा पहिला डोस घेणार नाही, असा हट्टच या व्यक्तीने केला आहे. या प्रकरणाचा व्हीडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आम्ही या व्यक्तीची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील दाही ब्लॉकमधील ही घटना आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम किकरवास नावाच्या एका आदिवासी बहुल गावी लसीकरणासाठी पोहोचली होती. मात्र, जेंव्हा या व्यक्तीला लस देण्याची वेळ आली तेव्हा त्याने नकार देण्यास सुरुवात केली.
त्याच्या या नकाराला वैतागून अधिकाऱ्यांनी विचारले की, कुणाला बोलवू म्हणजे तू लस घेशील? तेंव्हा त्याने म्हटले की, कुणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी पंतप्रधान मोदींना बोलावले जावे. मी लस घेईल ते केवळ पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीच! अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, गावात केवळ दोनच लोक आहेत ज्यांनी लस घेतली नाही. यामध्ये हा व्यक्ती आणि त्याची पत्नी या दोघांचा समावेश आहे.