कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पीएम मोदींना भेटणार, काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ ?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पीएम मोदींनी भेटल्यानंतर त्यांना केंद्रात कृषिमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. कॅप्टन यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज पीएम मोदींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.