Complaint against ghosts reported to police; The police also lodged a complaint

गुजरातच्या पंचमहलमध्ये एक व्यक्ती जंबुघोडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. तो भीतीने कापत होता. त्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन भूतांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. त्याने पोलिसात तक्रार केली की, भुताच्या एका गटाने त्याचा पाठलाग केला. दोघांनी त्याला पकडले, परंतु कसेतरी तो आपले प्राण वाचवून ठाण्यात आला आहे. पीडित खूपच घाबरलेला होता. त्यांनी पोलिसांना सांगितले की, मला भूतांपासून वाचवा. पोलिसांना त्याची ही विनंती विचित्रच वाटली. परंतु त्याच्या समाधानासाठी पोलिसांनी तक्रार नोंदविली. तो शेतामध्ये काम करीत होता, त्याचवेळी भूतांना त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, असे त्याने पोलिसांना सांगितले.

    वडोदरा : गुजरातच्या पंचमहलमध्ये एक व्यक्ती जंबुघोडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. तो भीतीने कापत होता. त्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन भूतांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. त्याने पोलिसात तक्रार केली की, भुताच्या एका गटाने त्याचा पाठलाग केला. दोघांनी त्याला पकडले, परंतु कसेतरी तो आपले प्राण वाचवून ठाण्यात आला आहे. पीडित खूपच घाबरलेला होता. त्यांनी पोलिसांना सांगितले की, मला भूतांपासून वाचवा. पोलिसांना त्याची ही विनंती विचित्रच वाटली. परंतु त्याच्या समाधानासाठी पोलिसांनी तक्रार नोंदविली. तो शेतामध्ये काम करीत होता, त्याचवेळी भूतांना त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, असे त्याने पोलिसांना सांगितले.

    पीएसआय मयंकसिंह ठाकोर यांनी सांगितले की, ते पावागढ येथे ड्यूटवर होते. तेव्हाच एक व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये आली. त्यांनी सांगितले की, तो फार अस्वस्थ होता. हे स्पष्ट होते की, तो असामान्यपणे व्यवहार करत होता. तो फार घाबरलेला होता. त्याला शांत करण्यासाठी त्याची तक्रार लिहून घेण्यात आली.

    पोलिसांनी व्यक्तीच्या कुटुंबियांना संपर्क केला. कुटुंबियातील सदस्यांनी सांगितले की, त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होता. मात्र, त्याने गेल्या 10 दिवसांपासून आपले औषध घेतले नव्हते. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली आणि त्याला घरी पाठविण्यात आले.
    पोलिसांनी केले समुपदेशन

    पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या व्यक्तीसोबत बोलले. ते म्हणाले की तो पोलिस स्टेशनमध्ये यामुळे आला होता कारण त्याला विश्वास होता की, पोलिस त्याला मदत करतील. पोलिस त्याला भूतांपासून वाचवतील. पोलिसांनी त्याला सुरक्षेचे आश्वासन दिले आणि त्याला औषधे नियमित घेण्यास सांगितले.