digvijay singh

भोपाळ : कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली. मात्र त्यांनी पक्षाचा आवाज बुलंद करताना कार्यकर्त्यांवरही निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी दिग्विजयसिंह यांनी केला. हरयाणा-पंजाबचे शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करीत आहे. मात्र  मध्यप्रदेशातील शेतकरी बांधव भोळे असून काँग्रेसी सुद्धा निद्रीस्त आहेत.

कृषी कायद्यांविरोधात सामान्य जनतेने आवाज बुलंद करण्याची गरज आहे, असे  दिग्विजयसिंह म्हणाले. उल्लेखनिय असे की, नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे राजगढ येथील यूथ काँग्रेसद्वारे मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिग्विजय सिंहांनी हिरवी झेंडी दाखवून मोर्चाला सुरूवात केली.