mamata banerjee

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पाचपैकी 4 राज्यांमध्ये जोरदार यश मिळविले आहे. सर्वच राज्यात काँग्रेसची दाणादाण झाली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे, असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात काम करावं, असा सल्लासुद्धा तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला दिला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे(Congress should merge with Trinamool; Advice to work under the leadership of Mamata Banerjee).

    कोलकाता : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पाचपैकी 4 राज्यांमध्ये जोरदार यश मिळविले आहे. सर्वच राज्यात काँग्रेसची दाणादाण झाली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे, असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात काम करावं, असा सल्लासुद्धा तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला दिला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे(Congress should merge with Trinamool; Advice to work under the leadership of Mamata Banerjee).

    काँग्रेसने वस्तुस्थिती समजून घ्यावी

    काँग्रेससारखा जुना पक्ष का नाहीसा होत आहे, हे मला समजत नाही. आम्हीही या पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने टीएमसीमध्ये विलीन व्हावे. हीच योग्य वेळ आहे. मग राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांवर आपण (नथुराम) गोडसेच्या तत्त्वांना मात देऊ शकतो, असे मत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे परिवहन व नगर विकास मंत्री फिरहाद हकीम यांनी मांडले.

    तर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही हकीम यांची री ओढली. काँग्रेस भाजपसारख्या शक्तीशी लढू शकत नाही, असे आम्ही बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसने हे समजून घ्यावं, असेही घोष म्हणाले.