‘रेड कॉरिडोर’मध्ये कोरोनाची दहशत; आठ नक्षल्यांचा मृत्यू तर भितीने अनेकांनी सोडली चळवळ

नक्षलवादी चळवळीला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. घनदाट जंगलात सुरक्षा दलांची कारवाई नक्षल्यांसाठी सध्या चिंतेचा विषय नसून कोरोनामुळे नक्षल्यांचे जगणे कठीण झाले आहे. तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशापर्यंत पसरलेल्या ‘रेड कॉरिडोर’मध्ये अनेक नक्षल्यांवर कोरोनारूपी संकटाने झडप घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे या दंडकारण्यातील नक्षल्यांची झोपच उडाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत वरिष्ठ नेत्यांसह 8 नक्षल्यांचा मृत्यू झाला आहे.

    हैदराबाद : नक्षलवादी चळवळीला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. घनदाट जंगलात सुरक्षा दलांची कारवाई नक्षल्यांसाठी सध्या चिंतेचा विषय नसून कोरोनामुळे नक्षल्यांचे जगणे कठीण झाले आहे. तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशापर्यंत पसरलेल्या ‘रेड कॉरिडोर’मध्ये अनेक नक्षल्यांवर कोरोनारूपी संकटाने झडप घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे या दंडकारण्यातील नक्षल्यांची झोपच उडाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत वरिष्ठ नेत्यांसह 8 नक्षल्यांचा मृत्यू झाला आहे.

    आतापर्यंत चिकनगुनिया, डेंगू आणि मलेरियासारख्या आजारांमुळे बऱ्याच माओवाद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टॉप माओवादी आणि त्यांच्या कॅडरवर बीती आणि चिंतेचे सावट पसरले आहे. स्पेशल इंटेलिजेंस ब्रांच आणि अँटी नक्सलाईट इंटेलिजेंस विंगचत्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांनी नक्षली चळवळ सोडून मुख्य प्रवाहात परतण्यास पसंती दिली आहे.