बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट आणि ‘या’ ठिकाणी लागला चांगलाच करंट ; VIDEO तुफान व्हायरल…

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. असं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.

    स्टंट करणं आणि सोशल मीडियावरून फॉलोअर्स मिळवणं, यात काही नवीन राहिलेलं नाही. पण अनेकदा याच स्टंट्समुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्टंट करत असलेल्या तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही.

    या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. असं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.

    आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही कधी मित्र, लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का? नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षिततेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे.