dev deepawali pm modi visit kashi varanasi ganga ghat aarti 15 lakhs diyas vb

उत्तर प्रदेशातून(Uttar Pradesh) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर पुरलेले अनेक मृतदेह(Dead Bodies Floating In Ganga River) पाण्याची पातळी वाढल्याने पाण्यावर तरंगत आहेत.

    कोरोना काळात(Corona) गंगेच्या किनारी कोरोना रुग्णांचे मृतदेह(Dead Bodies Floting In Ganga) वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर पुरलेले अनेक मृतदेह पाण्याची पातळी वाढल्याने पाण्यावर तरंगत आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. जशी-जशी पाण्याची पातळी वाढत आहे. तसे मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृतदेहांचे फोटो व्हायरल होत आहेत. काही मृतदेहांच्या हातात सर्जिकल ग्लोव्हज दिसत आहेत. या मृतदेहांना प्रयागराज मनपाच्या पथकाने बाहेर काढले आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

    प्रयागराज महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी नीरज सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही पूर्ण विधी आणि कर्मकांडांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहोत.”
    ते म्हणाले, “कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रयागराजमधील गंगेच्या काठावर संपूर्ण स्मशानभूमीचे चित्र निर्माण झाले होते. काही हिंदू लोक अल्पवयीन मुले, अविवाहित मुली आणि इतर मृतदेह याठीकाणी दफन करीत असतात. पण गंगेच्या काठी अशी परिस्थिती कधीच आली नाही. पाऊस आणि नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मृतदेह तरंगत आहेत. मनपाचे लोक स्वत: या मृतदेहांवर अंतिम संस्कार करीत आहेत.”

    प्रयागराज नगराध्यक्षा अभिलाषा गुप्ता नंदी यांनी माध्यमांना सांगितले की, “मृतदेह दफन करणे ही अनेक समाजात एक परंपरा आहे. मृतदेह जमिनीत विघटित होतात पण ते वाळूमध्ये होऊ शकत नाहीत. दरम्यान, ‘जिथे जिथे आपल्याला मृतदेह आढळत आहेत. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.”