हॉस्पिटलच्या शौचालयात सापडला जवानाचा मृतदेह, मध्यप्रदेशमधील आरोग्यव्यवस्थेचा असा उडालाय बोजवारा

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडलीय. भोपाळमधील जेपी हॉस्पिटलच्या शौचालयात एका होमगार्ड जवानाचा मृतदेह सापडला. होमगार्ड जवान पुष्पराज सिंग हे जेपी हॉस्पिटलमधील कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होते. सोमवारी ते बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हॉस्पिटलच्या शौचालयात त्यांचा मृतदेह आढळून आला. 

    देशात कोरोना थैमान घालत आहे. मध्यप्रदेशमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात एका हॉस्पिटलमध्ये एका होमगार्ड जवानाचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडालीय.

    मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडलीय. भोपाळमधील जेपी हॉस्पिटलच्या शौचालयात एका होमगार्ड जवानाचा मृतदेह सापडला. होमगार्ड जवान पुष्पराज सिंग हे जेपी हॉस्पिटलमधील कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होते. सोमवारी ते बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हॉस्पिटलच्या शौचालयात त्यांचा मृतदेह आढळून आला.

    जवानाच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. सोमवारपासून आम्ही पुष्पराज यांना शोधायला सांगत होतो. मात्र हॉस्पिटलच्या स्टाफपैकी कुणीही ही बाब गांभिर्यानं घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाला जाग आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

    या प्रकारानंतर हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित कऱण्यात आलं असून त्यांच्यावर बेपर्वाईचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल,असं आश्वासन हॉस्पिटलच्या वतीनं देण्यात आलंय.