lizard found at dinner at hotel; Bouncers beat the complaining youth

कर्नाटकातल्या हवेरी जिल्ह्यातील एका शाळेत मधल्या सुटीत देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली पाल आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. हे अन्न खाल्ल्याने 80 विद्यार्थी आजारी पडले आहेत. कर्नाटकातल्या व्यंकटपुरा तांडा या गावातल्या एका सरकारी शाळेत बालकांना मधल्या सुटीत पोषण आहार देण्यात आला. या जेवणात मेलेली पाल असल्याचे आढळून आले. यानंतर साधारण 80 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली(Dead Lizard found In Midday Meal in Bangalore).

    बंगळुरू : कर्नाटकातल्या हवेरी जिल्ह्यातील एका शाळेत मधल्या सुटीत देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली पाल आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. हे अन्न खाल्ल्याने 80 विद्यार्थी आजारी पडले आहेत. कर्नाटकातल्या व्यंकटपुरा तांडा या गावातल्या एका सरकारी शाळेत बालकांना मधल्या सुटीत पोषण आहार देण्यात आला. या जेवणात मेलेली पाल असल्याचे आढळून आले. यानंतर साधारण 80 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली(Dead Lizard found In Midday Meal in Bangalore).

    त्यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मुलांची तब्येत आता ठीक असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याप्रकरणी शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

    काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूमध्येही असा प्रकार घडला होता. अंगणवाडीतल्या बालकांसाठीच्या पोषण आहारात अंडी देण्यात आली होती. मात्र ही अंडी सडलेली होती, तसेच त्यात किडे झाले होते.

    काही विद्यार्थ्यांना अंड्यातून विचित्र वास येत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाला याविषयी माहिती दिली. त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. या अंगणवाडीतल्या साधारण 17 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.