दहा मिनिटांत डिलिव्हरी, झोमॅटोची नवी घोषणा वादात! १२-१५ हजारांची नोकरी आणि अपघात झाला तर… संसदेतही झाली चर्चा

हा सगळा जमाना इन्स्टंटचा आहे. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर मग ते जेवण असो की गाडी काही मिनिटांत ती ऑर्डर तुमच्यासमोर आणून ठेवण्याचं वैशिष्ठ्य या बाजारपेठेनं मिळवलेलं आहे. यातून स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांनीं अब्जावधींची कमाईही केलेली आहे. मात्र झटपट डिलिव्हरीच्या नादात, या साखळीतील काही घटकांकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. यावरुनच हा नवा वाद सुरु झालाय(Delivery in ten minutes, Zomato's new announcement in controversy! 12-15 thousand jobs and if there is an accident ... there was a discussion in Parliament too).

    नवी दिल्ली : हा सगळा जमाना इन्स्टंटचा आहे. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर मग ते जेवण असो की गाडी काही मिनिटांत ती ऑर्डर तुमच्यासमोर आणून ठेवण्याचं वैशिष्ठ्य या बाजारपेठेनं मिळवलेलं आहे. यातून स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांनीं अब्जावधींची कमाईही केलेली आहे. मात्र झटपट डिलिव्हरीच्या नादात, या साखळीतील काही घटकांकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. यावरुनच हा नवा वाद सुरु झालाय(Delivery in ten minutes, Zomato’s new announcement in controversy! 12-15 thousand jobs and if there is an accident … there was a discussion in Parliament too).

    झोमॅटोने नुकतीच १० मिनिटांत डिलिव्हरी अशी घोषणा केली. यानंतर यावरुन नवा वाद निर्माण झाला. १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याची घाई कशासाठी, यात अन्नाची पौष्टिकता राहील का, १० मिनिटांत डिलिव्हरी झाली नाही तर अन्न काय नासणार आहे का, खरचं हे योग्य पाऊल आहे का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले. जर ही ऑर्डर १० ऐवजी काही मिनिटांनी मिळाली तर काहीच फरक पडणार नसेल तर जीवावर उदार होऊन डिलिव्हरी बॉयने १० मिनिटांत डिलिव्हरी करायची तरी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न सामान्यांनी नाही तर अभिनेता राहुल शेठ, खासदार प्रियंका चतुर्वेदी, कार्ती चिदम्बरम यासारख्या मंडळींनी उपस्थित केला. इतकंच नाही यावर ट्विट तर झालेच पण संसदेतही हा मुद्दा चांगलाच गाजला.

    त्या डिलिव्हरी बॉयचा विचार कोण करणार?

    तुम्ही मोबाईलवरुन ऑर्डर दिली की तुमचे सामान तुमच्या दरवाजात दाखल होते. पण ही ऑर्डर घेवून येणारा कसा त्याचा जीव धओक्यात घालून ही ऑर्डर वेळेत पोहचवतो, याची माहिती करुन घेण्याची इच्छा फारशी कोणालाच नसते. त्यामुळेच या डिलिव्हरी बॉयच्या जीवाचा विचाप न करता १० मिनिटांत डिलिव्हरी सारख्या घोषणा केल्या जातात. बिल्डिगमध्ये ऐषोआरामत राहणाऱ्यांना कदाचित कंपनीची ही ऑफर लुभावणारी वाटू शकेलही. पण १० मिनिटांत ऑर्डर पोहचवताना त्या डिलिव्हरी बॉयटी किती तारेवरची कसरत होईल, त्याला कसा जीव धोक्यात घालावा लागेल, याचा विचारच कुणी करताना दिसत नाहीये.

    मुंबई, दिल्ली, गुरुग्रामसारख्या शहरांत मोठ्या प्रमाणात होम डिलिव्हरी दिली जाते. या सर्व महानगरांत वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या आहे. वाहतुकीतून रस्ता काढत, गाड्या चुकवत १० मिनिटांत डिलिव्हरी करणे हे या डिलिव्हरी बॉयच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीने घोषणा तर केलीय पण त्याची अंमलबजावणी त्या कपनीता काम करणाऱ्या तरुण डिलिव्हरी बॉयला करायची आहे. तो त्याच्या स्वताच्या बाईकवर ही डिलिव्हरी करणार आहे. यातीन अनेक डिलिव्हरी बॉय हे जुन्या गाड्या विकत घेऊन किंवा कुटुंबातून बाबापुता करुन गाडी घेतात, आणि करिअरसाठी शहरांत येत असल्याची माहिती आहे.

    अपघाताचा विमाही नाही?

    संसदेत हा मुद्दा उपस्थित झाला. डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेबाबात बोलताना, खासदार कार्ती चिदम्बरम म्हणाले की, जर अशा घाईच्या डिलिव्हरीत एखादा अपघात झाला तर विम्या कंपन्या या डिलिव्हरी बॉयला मोबदलाही देत नाहीत. सलील त्रिपाठी नावाच्या एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू याचप्रमाणे झाला. या डिलिव्हरी कंपन्यांना नियंत्रणात आणण्याची मागणी कार्ती चिदम्बरम यांनी केली आहे. डिलिव्हरीचा कालावधी १० मिनिटे करुन ही डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचे जीव धोक्यात टाकण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

    सध्या समस्या ही आहे की, या सगळ्या कंपन्यांमध्ये श्रेष्ठ कोम ही स्पर्धा सुरु झाली आहे. काहीजण २४ तासांत, काही जण सकाळ-संध्याकाळची मुदत देत होते. आता ही मुदत २ तास, अर्धा तास आणि आता तर १० मिनिटांवर येऊन ठेपलेली आहे. सोशल मीडियावर या निर्णयाबाबत सडकून टीका झाली. यावर अनेक मिम्सही तयार करण्यात आली आहेत. एकूणच हे प्रकरण गंभीर वळणावर यून ठेपलेले आहे.

    डिलिव्हरी बॉय यांच्यासमोरची आव्हाने?

    १. डिलिव्हरी बॉय यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही
    २. रस्त्यात अपघाताची शक्यता सर्वाधिक
    ३. शारिरिक व्याधी, आजार होण्याची शक्यता अधिक
    ४. विनाकारण कामाचा ताण वाढणार
    ५. इतके करुनही पगारवाढ आणि पदोनन्ती नाहीच.

    १२-१५ हजारांची नोकरी आणि अपघात झाला तर..?

    साधारणपणे एका डिलिव्हरी बॉयला महिन्याला १२,१५ हजार रुपयांचा पगार मिळतो. एखादे पाकिट गहाळ झाले, पडले तरी तो खर्च त्याच्याच पगारातून कापून घेण्यात येतो. त्यात एखाद्या ग्राहकाने १० मिनिटांत डिलिव्हरी झाली नाही आणि तक्रार केली तर ती डिलिव्हरी बॉयच्या नोकरीवर गदा असू शकते. म्हणजेच एका बाजूला डिलिव्हरी बॉयच्या जीवाला धोका तर दुसरीकडे नोकरी जाण्याची टांगती तलवारही त्याच्या डोक्यावर असणार आहे.

    अभिनेता आणि लेखक राहुल सेठ यानेही झोमॅटोची ही घोषणा धोकादायक आणि अनावश्यक असल्याचे सांगितले आहे. या निर्णयाने रायडर आणि रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाला धोका वाढेल असे त्याचे म्हणणे आहे. या वाढत्या टिकेनंतर शेअर बाजारातील झोमॅटोचे भावही उतरले आहेत.
    दुसरीकडे शिवसेना खासदार प्रियंका चतिर्वेदी यांनीही डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेचा मुद्दा संसदेत मांडला. हा दबाव धोकादायक ठरु शकतो, असे त्यांचे म्हणणे हे. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ३० मिनिटे वाट पाहणे, अवघड नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वेळेवर जेवण मिळाले नाही तर जग संपणार नाही, असे सांगत त्यांनी या १० मिनिटांच्या डिलिव्हरीच्या कल्पनेवर टीका केली आहे.

    विरोधानंतर झोमॅटोचे स्पष्टीकरण?

    या प्रकरणावर वाद, टीका झाल्यानंतर आता झोमॅटोचे हेड दीपेंद्र गोयल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यात स्पष्ट केले आहे की, १० मिनिटांची डिलिव्हरी ही जवळच्या ग्राहकांना आणि प्यापुलर, तयार असलेल्या वस्तूंसाठीच असणार आहे. १० मिनिटांत डिलिव्हरी करणाऱ्याला वेगळे बक्षीस देण्यात येणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याची गरजच काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.