अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंट सर्वात मोठा धोका, तर भारतात डेल्टा प्लस आणू शकते तिसरी लाट, महाराष्ट्राला सर्वाधिक भीती…

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चिंता संपूर्ण जगभरात वाढीस लागली आहे. अमेरिका आणि भारतातील जाणकांनी गेल्या २४ तासांत याबाबतचा इशारा दिला आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात कोरोनाची तिसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरु शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे अमेरिकेत कोरोना महामारीचे जाणकार अँन्थनी फौची यांनीही इशारा दिला आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चिंता संपूर्ण जगभरात वाढीस लागली आहे. अमेरिका आणि भारतातील जाणकांनी गेल्या २४ तासांत याबाबतचा इशारा दिला आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात कोरोनाची तिसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरु शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे अमेरिकेत कोरोना महामारीचे जाणकार अँन्थनी फौची यांनीही इशारा दिला आहे.

    अमेरिकेत कोरनाविरुद्धच्या लढाईत डेल्टा व्हेरिएंट हा सर्वात मोठा अडसर ठरण्याची भीती फौची यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या मूळ व्हेरिएंटपेक्षा डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक असून, गतीने त्याचा प्रसार होतो, त्यामुळे या आजाराची गंभिरता वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

    लसीकरणावर जास्त भर देण्याची गरज

    फायझरसह ज्या लसनिर्मिती कंपन्यांनी अमेरिकेत लशी तयार केल्या आहेत, त्या प्रभावी आहेत. कोरोनाच्या या डेल्टा व्हेरिंएटशी मुकाबला करण्याची क्षमताही त्यांच्यात असल्याचे फौची यांचे म्हणणे आहे. कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत, त्याचा जास्तीत जास्त उपोयग करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण लसीकरणाचे ध्येय लवकरात लवकर गाठण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे अमेरिकन सरकारचे सल्लागार जेफरे जेंटस यांच्या दाव्यानुसार, ४ जुलैपर्यंत ७० टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाचे ध्येय अमेरिका सरकार गाढू शकलेली नाही. हे लसीकरण होण्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.

    भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत ३ राज्यांना इशारा

    भारतात दुसरी लाट धोकादायक होण्यासाठी डेल्टा व्हेरिएंटच कारणीभूत ठरला होता. आता त्या चिंतेच नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची भर पडली आहे. कोरोनाचा नवा डेल्टा प्लस व्हेरिएंटच तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता याविषयाती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. हे सर्व लक्षात घेऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य सचिव राजेष भूषण यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट जगात ९ देशांमध्ये असून आत्तापर्यंत देशात याची २२ प्रकरणे समोर आली आहेत. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात असून, यातील १६ रुग्ण हे रत्नागिरी आणि जळगावमध्ये सापडले आहेत. इतर प्रकरणे ही केरळ आणि मध्यप्रदेशातील आहेत.