Division of Jammu and Kashmir into two states; All-party meeting with the Prime Minister

केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांची 24 रोजी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणा असून सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतर अनेक केंद्रीय नेते सगभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणुका घेण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच केंद्राद्वारे जम्मू-काश्मिरची दोन राज्यात विभागणी होण्याचीही शक्यता आहे. जम्मू आणि काश्मिर हे स्वतंत्र राज्य करण्याचा केंद्राचा विचार असल्याचे सूत्राने सांगितले.

    दिल्ली : केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांची 24 रोजी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणा असून सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतर अनेक केंद्रीय नेते सगभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणुका घेण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच केंद्राद्वारे जम्मू-काश्मिरची दोन राज्यात विभागणी होण्याचीही शक्यता आहे. जम्मू आणि काश्मिर हे स्वतंत्र राज्य करण्याचा केंद्राचा विचार असल्याचे सूत्राने सांगितले.

    16 पक्ष होणार सहभागी

    ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 ला रद्दबातल ठरवण्यात आले आणि त्यानंतर राज्याचा विशेष दर्जा संपुष्टात आणण्यात आला होता. यासोबतच जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या प्रकारची होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीसाठी जम्मू-काश्मिरातील 9 पक्षांना निमंत्रण देण्यात आले असले तरी या बैठकीत 16 पक्षांना चर्चेसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांना अद्याप निमंत्रण देण्यात आलेले नाही.

    केंद्र सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी आणि पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनीही फोन आला होता मात्र, अधिकृत निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगत, यासंदर्भात रविवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सीपीएम नेते व पीएजीडीचे प्रवक्ते एम.वाय. तारीगामी यांनी अद्याप निमंत्रण मिळाले नाही तथापि चर्चेसाठी पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत, असे सूचक विधान त्यांनी केले.

    हे सुद्धा वाचा