डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका, CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

कोरोनाची दुसरी लाट देशातून ओसरत असताना नव्या विषाणूच्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकारामुळे सध्या देशभरात एकच खळबळ माजली आहे. या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा आजपासून निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

    नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र दिसून आलं.

    दरम्यान त्यातच कोरोनाची दुसरी लाट देशातून ओसरत असताना नव्या विषाणूच्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकारामुळे सध्या देशभरात एकच खळबळ माजली आहे. या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा आजपासून निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    त्याच पार्श्वभूमीवर सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं असून हा विषाणूचा प्रकार धोकादायक नसल्याचा अहवाल शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. दरम्यान, लोकांनी डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकाराला घाबरून जाऊ नये, कारण हा विषाणू धोकादायक असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाही व विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेने संशोधन केल्याप्रमाणे महाराष्ट्रात फक्त दोनच जिल्ह्यात या डेटा प्लसचे रुग्ण सापडले असल्याची माहिती डॉक्टर मांडे यांनी दिली आहे.

    डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकारामुळे लहान मुलांवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं असून हा कोरोना विषाणूचा प्रकार धोकादायक नसल्याची दिलासादायक माहिती सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे.