बंगालच्या जनतेला सीएए हवा आहे, अमित शाहांची ममता बॅनर्जींवर टीका, बंगालमधील महिला सुरक्षेवरून आगपाखड

बंगालमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्यांच्या आईची हत्या होते आणि तिच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत, असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केलीय. बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ममता बॅनर्जी त्याबाबत अत्यंत निर्विकार असल्याची टीका अमित शाह यांनी केलीय. 

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता पुढील टप्प्यासाठीच्या प्रचारानं पुन्हा एकदा जोरदार वेग घेतल्याचं चित्र निर्माण झालंय. पहिल्या टप्प्यात महिला मतदारांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, आता भाजपनं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रचारात उतरवल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

    बंगालमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्यांच्या आईची हत्या होते आणि तिच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत, असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केलीय. बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ममता बॅनर्जी त्याबाबत अत्यंत निर्विकार असल्याची टीका अमित शाह यांनी केलीय.

    पश्चिम बंगालमधील बहुतांश नागरिकांना घुसखोरी नको असून सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा हवा असल्याचा दावा अमित शाह यांनी केलाय. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घुसखोरीमुळं बंगालमधील गुन्हेगारी वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. बंगालमध्ये सीएएची अंमलबजावणी व्हावी, हीच बंगालच्या जनतेची इच्छा असून आपण हे करणारच असल्याचा दावाही शाह यांनी केला.

    सीएएच्या मुद्दा यंदाच्या निवडणुकीत कळीचा ठरतोय. या मुद्द्यावरून मतांचं विभाजन होण्याची शक्यता असून त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या मुद्द्याचा बंगालच्या निवडणुकीत नेमका काय परिणाम होतो, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.