प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कुशीनगर येथे रागावलेल्या नवविवाहीत पत्नीची मनधरणी करायला गेलेल्या पतीचे पत्नीनेच गुप्तांग कापल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील कुशीनगर परिसरात ही घटना घडली असून गोपाळगंज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

    कुशीनगर (Kushinagar). रागावलेल्या नवविवाहीत पत्नीची मनधरणी करायला गेलेल्या पतीचे पत्नीनेच गुप्तांग कापल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील कुशीनगर परिसरात ही घटना घडली असून गोपाळगंज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

    गोविंद मांझी असे पीडित नवऱ्याचे नाव असून बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील जमसडी गावातील तो रहिवासी आहे. गोविंद याचे चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील हरवंश पट्टी गावातील मुलीशी लग्न झाले होते. लग्नाला काही महिने उलटल्यानंतर त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. पत्नी लग्न होऊनही लपून छपून दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. गोविंदने तिला फोनवर बोलण्यास विरोध केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि पत्नी रागावून तिच्या माहेरी निघून गेली.

    गोविंदचे तिच्यावर प्रेम असल्याने पत्नीची मनधरणी करायला तो बुधवारी कुशीनगर इथे सासरी गेला. मात्र दोघांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्यांच्यात गुरुवारी वाद झाला. दोघांचे वाद पाहून घरच्यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आणि दोघंही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. मात्र पतीबद्दल प्रचंड राग मनात खदखदत असल्याने माथेफिरु पत्नीने झोपलेल्या पतीचे ब्लेडने गुप्तांग कापले. त्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळे धावत आले आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना धक्काच बसला. घरच्यांनी त्वरीत त्याला गोपाळगंज रुग्णालयात घेऊन गेले. सध्या त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. बिहारच्या उचका गावातील पोलीस स्थानकात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.