सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीचा हात ; इतकी मोठी गोष्ट लपवणं पडलं महागात

जहाँ यांचे नाव एका सामूहिक बलात्कारातील (gang rape accused ) आरोपीशी देखील जोडले गेले आहे. एवढेच नव्हे तर दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

बंगाली सुपरहिट अभिनेत्री नुसरत जहाँ ( Nusrat Jahan ) २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून ( Bashirhat Lok Sabha constituency) खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. जहाँ यांचे नाव एका सामूहिक बलात्कारातील (gang rape accused ) आरोपीशी देखील जोडले गेले आहे. एवढेच नव्हे तर दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

५ फेब्रुवारी २०१२ मध्ये कोलकाताच्या पार्क स्ट्रिट परिसरात एका विवाहित महिलेवर पाच तरूणांनी सामूहिक बलात्कार केला आणि चालत्या गाडीतून फेकून भामटे फरार झाले. ही घटना उघडकीस येताच मोठा असंतोष व्यक्त केला गेला. पोलिसांनी या घटनेची तपासणी केल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. परंतु दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींमध्ये कादर खान आणि मोहम्मद अली यांचा समावेश होता आणि नुसरत जहाँ तेव्हा कादर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या.

ही घटना घडण्याआधी या दोघांनी त्याच वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सामूहिक घटनेच्या नंतर फरार आरोपी कादर खान नुसरत जहाँ यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी ही महत्त्वाची गोष्ट लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.