indian cow
प्रतिकात्मक फोटो

एक शेतकरी चक्क गायींची तक्रार घेऊन पोलिसात (Police Complaint Against Cow)गेला होता. या तक्रारीची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल(Viral) होत आहे.

    कर्नाटकातील (Karnataka)शिवमोग्गा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. शेतकरी चक्क गायींची तक्रार घेऊन पोलिसात (Police Complaint Against Cow)गेला होता. या तक्रारीची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल(Viral) होत आहे. रमैया नावात शेतकऱ्याने पोलिसात दिलेली तक्रार वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

    शेतकऱ्याचे म्हणणे आहे की त्याच्या चार गाई दूध देत नाहीत. गाईंना नियमित चारा देतो, तरीही ती दूध देत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल करावी. दररोज सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत गायी चरायला घेऊन जातो, असे शेतकऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी गायी दूध देत नाहीत. अशा स्थितीत गाईंना पोलीस ठाण्यात बोलावून समजावून सांगा असंही त्याने आपल्या तक्रार करताना म्हटलं होतं.
    शेतकऱ्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. अशी विचित्र तक्रार दाखल करता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत शेतकऱ्याला आश्वासन दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे म्हणणे ऐकून शेतकरीही घरी परतला. मात्र या घटनेची जोरदार चर्चा आहे.