उत्तर प्रदेशमध्ये लग्न मंडपाला भीषण आग, पाचजणांचा मृत्यू, सातजण जखमी

मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.

    लखनौ : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मोरादाबाद येथे लग्नाची तयारी (Marriage Preparations) सुरू असलेल्या तीन मजली इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना काल घडली. या आगीत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनी मदत करीत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे (Short Circuit) लागली असावी, असा अंदाज आहे.

    मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले, मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.