durg express fire

वैष्णोदेवीहून छत्तीसगडला चाललेली दुर्ग एक्सप्रेस(Fire Brokes Out In Durg Express) जेव्हा मध्यप्रदेशच्या(Madhya Pradesh) हेतमपूर स्टेशन परिसरात पोहोचली, तेव्हा काही डब्यांमधून धूर येत असल्याचं दिसलं. त्यानंतर तातडीनं ट्रेनमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि ट्रेनपासून दूर नेण्यात आलं. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच या आगीनं (The Burning Train)रौद्र रुप धारण केलं आणि ट्रेनच्या चार बोगींनी पेट घेतला.

    भोपाळ : मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात हेतमपूर रेल्वे स्टेशन परिसरात चालत्या ट्रेनचे डबे जळून खाक (Durg express caught with fire in MP) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ट्रेनच्या डब्यातून (Fire in Durg exress) अचानक धूर येऊ लागला आणि पाहता पाहता चार डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

    वैष्णोदेवीहून छत्तीसगडला चाललेली दुर्ग एक्सप्रेस(Fire Brokes Out In Durg Express) जेव्हा मध्यप्रदेशच्या हेतमपूर स्टेशन परिसरात पोहोचली, तेव्हा काही डब्यांमधून धूर येत असल्याचं दिसलं. त्यानंतर तातडीनं ट्रेनमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि ट्रेनपासून दूर नेण्यात आलं. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच या आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि ट्रेनच्या चार बोगींनी पेट घेतला. पाहता पाहता या चारही बोगींमधून आगीचे लोटच्या लोट बाहेर पडू लागले. या आगीत ए वन आणि ए टू या दोन एसी बोगीज जळून खाक झाल्या आहेत. हे दोन डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत. इतर डब्यांत धूर घुसल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच ही ट्रेन ग्वालियरकडे रवाना होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

    ही आग भडकण्यापूर्वीच रेल्वेतील सर्व प्रवासी खाली उतरले असल्यामुळे त्यात कुणाचाही बळी गेला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. रेल्वे मंडळाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीची कल्पना मिळाल्यानंतर तातडीनं स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाचे ८ बंद घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.