भोपाळच्या हमिदिया हॉस्पिटल परिसरात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग, ४ मुलांचा मृत्यू

ज्या मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली, तो वॉर्ड दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करण्यात येणार होता, असे सांगण्यात येते आहे. त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. आग लागलेल्या बिल्डिंगमधून अनेक रुग्णांना स्ट्रेचरवरुन दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले. मुलांच्या नातेवाईकांना आत जाण्यापासून रोखण्यात आले होते, त्यामुळे मुलांना शोधण्यासाठी पालकांचा आणि नातेवाईकांचा काही काळ गोँधळ उडाला होता.

  भोपाळ – भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल कॅम्पसमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कमला नेहरु बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील बालरुग्ण विभागात ही आग लागल्याची माहिती आहे. यात

  चार नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. तीन तासांच्या बचावकार्यानंतर अग्निशमन दलाचे  जवान आणि पोलिसांनी रात्री साडे बारा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.

  घटनास्थळी पोहचलेले मंत्री विश्वास सारंग यांनी ४० पैकी ३६ मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहितीही दिली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांना प्रत्येक ४ लाखांची मदतही सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत, घटनेबद्दल दुख व्यक्त करत, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  ज्या मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली, तो वॉर्ड दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करण्यात येणार होता, असे सांगण्यात येते आहे. त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. आग लागलेल्या बिल्डिंगमधून अनेक रुग्णांना स्ट्रेचरवरुन दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले. मुलांच्या नातेवाईकांना आत जाण्यापासून रोखण्यात आले होते, त्यामुळे मुलांना शोधण्यासाठी पालकांचा आणि नातेवाईकांचा काही काळ गोँधळ उडाला होता.

  आगीचे कारण अस्पष्ट

  आगीची वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. सिलिंडर किंवा व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे काही जणांचे म्हणणे आहे, तर काही जण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अहवाल मागवला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. धूर जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. यापूर्वी ७ ऑक्टोबरलाही नव्या बिल्डिंगमधील ठेकेदाराच्या स्टोर रुममध्ये आग लागल्याची घटना घडली होती. मात्र अग्निशन दलाने एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवले होते.