नणंदेच्या नवऱ्यासोबतच्या  प्रेमात अडसर ठरणाऱ्या कुटुंबातील ९ जणांना दिलेले अन्नातून विष

रेश्मा आणि तिच्या नणंदेचा पती लोहकन खान यांचं सूत जुळलं. रेश्माच्या सासरच्या व्यक्तींचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे रेश्मा आणि लोहकननं एक योजना आखली. सासरच्या सर्व मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. विष मिसळण्यात आलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेच बेशुद्ध पडले. यानंतर रेश्मा आणि लोहकन यांनी घरातून पळ काढला.

    मध्यप्रदेश: प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. पण या प्रेमापोटीच एका महिलेने कुटुंबातील तब्बल नऊ जणांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातील या महिलेचे तिच्या नणंदेच्या नवऱ्यासोबत सूत जुळले होते. मात्र आपल्या प्रेमास अडथळा ठरणाऱ्या कुटुंबियांना संपविण्याचा निर्णय घेत. महिलेने कुटुंबातील ९ सदस्यांना जेवणातून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

    बरासो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिमार गावात वास्तव्यास असलेल्या रेश्मा नावाच्या महिलेचे तिच्या नणंदेचा नवरा लोहकन खानशी प्रेम संबंध होते. मात्र सासरची मंडळी त्यांच्यासाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे प्रेमसंबंधांत आडकाठी करणाऱ्या सासरच्या मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. त्यानंतर रेश्मा आणि लोहकन खान पळून गेले.

    रेश्माच्या पहिल्या नवराचा मृत्यू झाला. असून रेश्माचा दुसरा विवाह तिच्या लहान दीराशी झाला. यानंतर रेश्मा आणि तिच्या नणंदेचा पती लोहकन खान यांचं सूत जुळलं. रेश्माच्या सासरच्या व्यक्तींचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे रेश्मा आणि लोहकननं एक योजना आखली. सासरच्या सर्व मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. विष मिसळण्यात आलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेच बेशुद्ध पडले. यानंतर रेश्मा आणि लोहकन यांनी घरातून पळ काढला.

    शेजारच्यांना रेश्माच्या घरातून अनेक तास कोणाचाही आवाज आला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. शेजारी घर पोहोचताच सगळे जण बेशुद्धावस्थेत आढळून आले. शेजारच्या व्यक्तींनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना उपचारांसाठी मेहगाव रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्यानं मग सगळ्यांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांकडून रेशमाया व लोहकनचा शोध सुरु आहे