मध्य प्रदेशातील हरदा इथल्या खिरकिया ब्लॉकमधील झांझरी इथं राहणाऱ्या एका दाम्पत्याला ही उलट्या पायाची मुलगी झाली आहे. हरदा जिल्हा रुग्णालयात (Harda District Hospital) सोमवारी दुपारी 12 वाजता या महिलेची डिलीव्हरी झाली. प्रसूतीनंतर बाळ त्यांच्या हातात देण्यात आले. यावेळी मुलीचे दोन्ही पाय उलटे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मुलीचे असे पाय बघून घाबरलेल्या आई-वडिलांनी या नवजात मुलीला रुग्णालयातच टाकून धूम ठोकली.
भोपाळ : बऱ्याच वेळा जन्मत:च मुलांमध्ये काही दोष असतात. यामुळे आई-वडिल घाबरून जातात. मात्र, मध्य प्रदशेतात नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये असलेले त्याचे शारिरीक दोष पाहून त्याचे आई-वडिल नुसते भयभीत झाले नाहीत तर घाबरुन बाळाला रुग्णालयातच सोडून पळून गेले आहेत. कारण जन्माला आलेल्या बाळाचे पाय उलटे आहेत.
मध्य प्रदेशातील हरदा इथल्या खिरकिया ब्लॉकमधील झांझरी इथं राहणाऱ्या एका दाम्पत्याला ही उलट्या पायाची मुलगी झाली आहे. हरदा जिल्हा रुग्णालयात (Harda District Hospital) सोमवारी दुपारी 12 वाजता या महिलेची डिलीव्हरी झाली. प्रसूतीनंतर बाळ त्यांच्या हातात देण्यात आले. यावेळी मुलीचे दोन्ही पाय उलटे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मुलीचे असे पाय बघून घाबरलेल्या आई-वडिलांनी या नवजात मुलीला रुग्णालयातच टाकून धूम ठोकली.
भूताचे पाय उलटे असतात अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळं घाबरलेल्या आई-वडिलांनी या मुलीला स्वीकारले नाही. या मुलीला रुग्णालयातच सोडून ते पळून गेले. या मुलीच्या दोन्ही पायाची बोटं मागच्या दिशेनं आहेत. वैद्यकीय शास्त्रात ही अतिशय दुर्मीळ घटना असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य बाळांचे जन्मतः वजन साधारण 2.7 किलो ते 3.2 किलो असते. मात्र, या बाळाचे वजन फक्त 1.6 किलो आहे. इथले डॉक्टर्स आणि परिचारिका या बाळाची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. लवकरच या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिचे पाय सरळ केले जाणार असल्याचे येथील रुग्णालयाने सांगीतले.