girl in haridwar ghat

एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका तरुणीसोबत(Hidwar Ghat Girl Video Viral) असं काही घडलं आहे की ती अचानक जोरजोरात ओरडत आहे.

  हरिद्वार : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका तरुणीसोबत असं काही घडलं आहे की ती अचानक जोरजोरात ओरडत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by BaaM diaries (@baamdiaries)

  व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता. एक तरुणी गंगा नदीत आंघोळ करत होती. आधी सगळकाही नीट होतं. मात्र एका क्षणार्धात तिच्या आनंदावर विरजन पडलं. ती आंघोळ करताना पाण्यातून काही तरी वाहत तिच्यापुढे आलं.समोरून काहीतरी वाहत आलेलं पाहून ती किंचाळली.

  तरुणी गंगेत आंघोळ करत असताना तिच्याजवळ एक सापासारखं दिसणारं काही तर वाहत आलं. त्यानंतर ती खूप घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली. ती पाण्यातून बाहेर पडली.

  दरम्यान हा व्हिडिओ शूट करणारे तरुणीच्या मित्रानं सांगितलं की, वाहत येणारा साप नाही तर गवत होतं. मात्र अचानक पाण्यात असं काही तरी वाहत आल्यावर  कोणीही घाबरेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहताना क्षणभरासाठी आपल्यालाही पाण्यातून साप तर वाहत आला नाही ना ? असा प्रश्न पडतो.