Sadhvi Pragya Singh Thakur not heard in Malegaon blast case in special NIA court

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भोपाळमधील व्यापाऱ्यांना भर सभेत खडे बोल सुनावले. तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा तिखट शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. नेकदा प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्त्यांमुळेच चर्चेत असतात.

भोपाळ : खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भोपाळमधील व्यापाऱ्यांना भर सभेत खडे बोल सुनावले. तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा तिखट शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. विकास कामे करणे हे लोकप्रतिनिधींच काम असले तरी तुम्ही सुद्धा यासंदर्भात जागृक राहणेही गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. साध्वी प्रज्ञा या भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर गेल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच सुनावले.

तुम्ही लोकं आम्हाला मतदान करुन विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. तुम्ही लोकांनाही यासंदर्भात जागरूक राहण्याची गरज आहे. मात्र असे होताना दिसत नाही. तुम्ही जागरूक नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही यासंदर्भात जागृक नसल्याने विकासकाम होते नाहीत, अशा शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांचे कान टोचले.

प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सल्ला देताना तुम्ही जागरूक राहणे गरजेचे आहे असे म्हटले. व्यापारी जागरूक असले तर त्यांचा विकासकामांमध्ये जास्त सहभाग असतो, असे मतही प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केले. अशाप्रकारे प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना थेट सभेमध्ये सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे भर सभेमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. अनेकदा प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्त्यांमुळेच चर्चेत असतात.