marriage viral video

    सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. सध्या असाच एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल(Video Viral On Social Media) झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाने आपल्या नवरीला उचलून घेतले आहे. इतकचं नाही तर त्याने सर्वांसमोर आपल्या नवरीला किस केलं आहे.

    या व्हिडिओमध्ये लोकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसत आहे. नवरदेवाने आपल्या नवरीला उचलून घेतले आहे. नवरीला उचलून घेतल्यानंतर हा नवरेदव तिला घेऊन गोल फिरतो आहे. हा प्रकार बघून त्याच्या बाजूला उभे असलेले सगळे खुश झाले आहेत.

    थोडा वेळ तिला उचलून धरून पुन्हा त्याने नवरीच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. नवरीने नकार देऊनही तो तिला पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी नवरीने गालावर किस करु न दिल्यामुळे नंतर नवरदेवाने नवरीच्या कपाळावर किस केले आहे. भर मंडपात नवरीला किस केल्यानंतर नेटकरी अवाक् झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. हा व्हिडिओ royal_couples48 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.