up groom searched all night failed to reach brides house in varanasi uttar pradesh

नवरदेव (Groom beaten in Madhya Pradesh)असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी अडवले. आमचे कुटुंब दु:खात असताना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात ? असा प्रश्न त्यांनी केला.

    मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) सागर जिल्ह्यातील रामपुरा(Rampura) गावात एका नवरदेवाला बेदम मारहाण(Groom beaten) करण्यात आली. वरात निघण्यापुर्वी तो घोड्यावर बसून कुलदेवताचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. त्या गल्लीत एका घरात शोकाकूल वातावरण होते म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचे समजते.

    शोकाकूल वातावरणात घरासमोरून नवरदेव जात असल्यामुळे तिथल्या लोकांना ते आवडले नाही. त्यामुळे नवरदेव असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी अडवले. आमचे कुटुंब दु:खात असताना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात ? असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दीक वाद झाले. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मुकेश यादव आणि चंदन यादव यांनी नवरदेवाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

    या घटनेनंतर नवरदेव बलराम पटेल याने लग्नाची मिरवणूक सासरच्या घरी न नेता नातेवाईकांसह शेट पोलीस स्टेशनमध्ये नेकी तसेच आरोपी चंदन यादव, मुकेश यादव आदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.