अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा एकदम जवळचा साथीदार अटकेत; तब्बल २४ वर्षांपासून होता फरार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा एकदम जवळचा साथीदार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गुजरात एटीएसला यश आले आहे. तब्बल २४ वर्षांपासून हा आरोपी फरार होता.त्याच्या अटकेनंतर दाऊदशी संबंधित महत्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झारखंड : गुजरात एटीएसने एक धाडेकेबाज कामगिरी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा एकदम जवळचा साथीदार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गुजरात एटीएसला यश आले आहे. तब्बल २४ वर्षांपासून हा आरोपी फरार होता.

अब्दुल माजिद कुट्टी असे या आरोपीचे नाव आहे. झारखंडच्या जमशेदपूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर दाऊदशी संबंधित महत्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुलं, ७५० काडतूसं आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. अन्य या प्रकरणी अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र कुट्टी २४ वर्षांपासून फरार होता अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.

कुट्टीची करोना तपासणीसाठी केल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.