काश्मीरमध्ये गुपकार आघाडीचा विजय, जम्मूमध्ये भाजपची सरशी, काँग्रेसला धक्का

कलम ३७० हटवल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. विशेषतः भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एकूण २८० जागांसाठी हे मतदान पार पडलं. त्यापैकी गुपकार आघाडीनं १०८ जागी विजय मिळवला तर भाजपला ६० जागा मिळाल्या. काँग्रेसला एकूण २२ जागांवर यश मिळाले.

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (DDC) निवडणुकीत काश्मीर प्रांतात गुपकार आघाडीने विजय मिळवला असून हिंदुबहूल जम्मूमध्ये भाजपची सरशी झालीय. तर काँग्रेस दोन्ही ठिकाणी तिसऱ्या क्रमाकांवर फेकला गेलाय.

कलम ३७० हटवल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. विशेषतः भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एकूण २८० जागांसाठी हे मतदान पार पडलं. त्यापैकी गुपकार आघाडीनं १०८ जागी विजय मिळवला तर भाजपला ६० जागा मिळाल्या. काँग्रेसला एकूण २२ जागांवर यश मिळाले.

भाजपने जिंकलेल्या एकूण ६० पैकी ५७ जागा या जम्मूमधील आहेत. काश्मीरमध्ये मात्र भाजपला विजय मिळवण्यात यश आलं नाही. काश्मीर प्रांतातील बांदीपोरा, श्रीनगर आणि पुलवामा या जिल्ह्यांतील केवळ एकेका जागेवर भाजपला समाधान मानावं लागलं. गुपकार आघाडीनं काश्मीरमध्ये ७१ ठिकाणी विजय मिळवला. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या वाहीद पारा या पीडीपी नेत्याचा या निवडणुकीत विजय झाला.

कलम ३७० हटवल्यानंतर पहिलीच निवडणूक

कलम ३७० हटवल्यानंतर होणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे याकडं सर्वाचं लक्ष होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयाला जम्मू काश्मीरच्या जनतेतून काय प्रतिसाद मिळतो, याची लिटमस टेस्ट या निवडणुकीतून होणार होती. त्यानुसार हिंदुंची लोकसंख्या अधिक असणाऱ्या जम्मूमध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय. तर जम्मूमधील नागरिकांनी मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नाकारून गुपकार आघाडीला पसंती दिलीय.

गुपकार आघाडीचे यश

जम्मू काश्मीरमधील सात राजकीय पक्षांनी एकत्र येत गुपकार आघाडीची स्थापना केलीय. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्खाली गुपकार आघाडीने ही निवडणूक लढवली. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटच्या मेहबुबा मुफ्ती आणि इतर असे सात पक्ष या आघाडीत सहभागी आहेत.