Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

लखनऊ : प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहल बघायचंय म्हणत पत्नीनं आपल्या पतीला फसवल. प्रियकरासोबत कट रचून तिने पतीची निघृण हत्या केली.

उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. यमुना एक्सप्रेसवे येथील राया कट परिसराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटणे कठीण होतं. मात्र, खिशात सापडलेल्या फोटोमुळे पोलिसांना संबंधित व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची धक्कायक माहिती समोर आली.

पत्नीने प्रियकरासोबत कट रचून संबंधित व्यक्तीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. मृतक व्यक्तीचं नाव शिवकुमार असं आहे. तो २२ वर्षांचा होता. तर त्याची पत्नी २० वर्षांची होते. दोघं पती-पत्नी १४ डिसेंबर रोजी आग्रा फिरायला आले होते. मात्र, आग्राहून परतत असताना पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.

प्रियकर हा पत्नीचा चुलत भाऊ होता. या दोघांचे अनैतिक संबध होते. मात्र, तिचा विवाह शिवकुमरसह झाला असल्याने तिने पतीच्या हत्येचा कट रचला.