Haryana CM's convoy blocked with black flags, 13 farmers charged with murder

आंदोलन करत ताफा अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर आयपीसी कलम ३०७, १४७, १४८, १४९, १८६, ३५३, ५०६ लावण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हरियाणाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांनी खट्टर सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन करणे हा शेतकऱयांचा अधिकार आहे. खट्टर सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

हरियाणा : अंबाला नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडय़ांचा ताफा अडवला. यामुळे अंबाला पोलिसांनी १३ शेतकऱ्यांवर खुनाचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

आंदोलन करत ताफा अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर आयपीसी कलम ३०७, १४७, १४८, १४९, १८६, ३५३, ५०६ लावण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हरियाणाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांनी खट्टर सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन करणे हा शेतकऱयांचा अधिकार आहे. खट्टर सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कट्टर यांनी सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी असेही म्हटले होते. त्यामुळे आता शेतकरी आंदोलन चांगलेच पेटण्याची शक्यता आहे.