श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरमधील (Srinagar) लावापोरा (Lawaypora ) भागात दहशतवादी (Terrorist) व जवानांमध्ये (security forces) झालेल्या जोरादार चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा (3 terrorist killed) करण्यात जवानांना यश आलं आहे.

श्रीनगरमध्ये (Srinagar)  दहशतवादी (Terrorist) आणि जवानांमध्ये (security forces) जोरदार चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनगरमधील लावापोरा (Lawaypora ) भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या जोरादार चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

काल मंगळवारी सुरू झालेली ही चकमक आजही सुरूच आहे. जवानांची एक सयुंक्त तुकडीही कामगिरी राबवत आहे. दरम्यान, चकमक सुरू असलेल्या ठिकाणी काही स्थानिक तरूणांकडून दगडफेक केली गेली, यावेळी त्यांना पळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधारांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला.

जवानांची चाहूल लागताच एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला, ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.