केरळमध्ये आभाळ फाटलं! परतीच्या पावसाचा कोप ; अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायममध्ये १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इडुक्कीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

    केरळमध्ये आभाळ फाटलं असून परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायममध्ये १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इडुक्कीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

    पावसानं काहीसी विश्रांती घेतल्यामुळं लष्कराचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला मदतकार्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. अजूनही कुटिकल, कोट्टायम आणि इडुक्की या ठिकाणी १२ जण बेपत्ता आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

    आलेप्पीमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कारण याठिकाणी सगळीकडं पावसाचं पाणी साचलेलं आहे. मात्र राज्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.