हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत ; 123 रस्ते बंद

राज्यात 24 तासांत मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातांत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ गोठ्यांसह 15 पेक्षा जास्त घरं कोसळली आहेत. त्याचप्रमाणे पावसामुळे राज्यातील 123 रस्ते बंद झाले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे 1,108 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

    शिमला:  गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मागील 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 130 दिवसांत राज्यात 432 लोकांना पावसामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

    एचपीडीएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 24 तासांत मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातांत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ गोठ्यांसह 15 पेक्षा जास्त घरं कोसळली आहेत. त्याचप्रमाणे पावसामुळे राज्यातील 123 रस्ते बंद झाले आहेत.

    शेती आणि फलोत्पादन क्षेत्रात 745 कोटींचे नुकसान झालं आहे. एचपीडीएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अद्याप 12 जण बेपत्ता आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे 1,108 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.