एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू ; अमित शहांचा इशारा

सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. राज्यातून टीएमसी सरकार हटवायचं आहे. आजही बंग भूमी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल, असं ते म्हणाले.

    कोलकाता: पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही बंगालमधून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू, असं सांगतानाच सत्ता येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू, असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.

    सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. राज्यातून टीएमसी सरकार हटवायचं आहे. आजही बंग भूमी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल, असं ते म्हणाले.

    सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गंगासागर मेळ्यावर लाखो रुपये खर्च करून हा मेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बंगालमध्ये वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यासाठी १० हजार कोटी रुपये पाठवले होते. मात्र, हे पैसे लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. असं शहा म्हणाले.