The mother killed the child

प्रमिला असे आपल्या मुलाचा जीव घेणाऱ्या क्रूर मातेचे नाव आहे. तर सात्नविक असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या आईला अटक केली आहे. चिमुरडा आईकडे वारंवार दुध पिण्याचा हट्ट करत होता. मात्र, मुलगा ऐकत नसल्याने प्रमिला चिडली आणि रागाच्या भरात तिने मुलाला जमिनीवर आपटले. या घटनेत सात्विक गंभीर जखमी झाला.

    कोरबा : अगदी तीन चा वर्षांची होईपर्यंत अनेक मुलं आपल्या दूध पितात. मुलांची ही सवय सोडवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. मात्र, एका महिलेने दूध पिण्याच्या हट्ट करणाऱ्या आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. छत्तीसगडच्या कोरबा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

    प्रमिला असे आपल्या मुलाचा जीव घेणाऱ्या क्रूर मातेचे नाव आहे. तर सात्नविक असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या आईला अटक केली आहे.
    चिमुरडा आईकडे वारंवार दुध पिण्याचा हट्ट करत होता. मात्र, मुलगा ऐकत नसल्याने प्रमिला चिडली आणि रागाच्या भरात तिने मुलाला जमिनीवर आपटले. या घटनेत सात्विक गंभीर जखमी झाला.

    घटनेच्या वेळी महिलेची सासू आणि सासरे घरात उपस्थित होते. तर पती कामावर गेले होते. मुलाचा आवाज ऐकून सासू-सासरे धावत आले. मुलाला जखमी अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
    पोलिस तपासादरम्यान प्रमिला यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून तिच्यावर उपचार केले जात आहेत.