य़शस्वी होण्यासाठी Internet कसा कराल वापर?; जाणून घ्या IAS ऑफिसर अंशुमन यांचा यशाचा मूलमंत्र

भारतामध्ये अनेक मुलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSCची परीक्षा देतात. मात्र IAS ऑफिसर बनण्यासाठी मेहनतीने अभ्यास करावा लागतो. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असल्यामुळे अभ्यास नेमका कसा करावा याचा विचार मुलांच्या मनात येत असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी IAS ऑफिसर अंशुमन राज यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

    दिल्ली : भारतामध्ये अनेक मुलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSCची परीक्षा देतात. मात्र IAS ऑफिसर बनण्यासाठी मेहनतीने अभ्यास करावा लागतो. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असल्यामुळे अभ्यास नेमका कसा करावा याचा विचार मुलांच्या मनात येत असतो.

    अशा विद्यार्थ्यांसाठी IAS ऑफिसर अंशुमन राज यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 2019 साली UPSC परीक्षेमध्ये 107 रँक मिळवून अंशुमन राज IAS ऑफिसर बनले आहेत. बिहारच्या बक्सरमध्ये राहणारे अंशुमन राज यांनी लहानपणापासूनच IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. कोलकत्तामध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी UPSCच्या तयारीसाठी पूर्णवेळ अभ्यास करायला सुरुवात केली. UPSCची परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी 3 वेळा प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. मात्र त्यांनी 2019 मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि अधिकारी बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. अंशुमन राज सांगतात UPSC परीक्षेमध्ये प्लॅनिंगने अभ्यास करायला हवा.

    पुस्तकं कोणती वापरायची हे आधीच ठरवलं पाहिजे. त्याकरता अभ्यासाची चांगली रणनीती तयार करता येऊ शकते. शिवाय इंटरनेटचा फायदा घेता येऊ शकतो. मेहनतीशिवाय स्मार्ट वर्कवर देखील भर द्यावा. अंशुमन राज सांगतात दिल्लीमध्ये यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करता येतं असं नाही. आपण आपल्या घरी राहूनसुद्धा अभ्यास करू शकतो. राज यांनी UPSC परीक्षेच्या अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर केला. यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांचे इंटरव्यू पाहिले त्यामुळे अभ्यासाची रणनीती ठरवता आली. त्याशिवाय रिवीजन आणि रायटिंग प्रॅक्टिसवर देखील भर दिला.