पतीने पत्नीचा खून करुन सुटकेसमध्ये मृतदेह ठेऊन लावली आग, कुटुंबाला सांगितलं मृत्यूच भलतंच कारण – पोलिसांनी असा लावला छडा

एसव्हीआआर या सरकारी रुग्णालयाच्या शेजारी जळलेल्या अवस्थेत हैदराबादमधील(Hyderabad) एका २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणामध्ये महिलेचा पती(Husband Killed Wife) मुख्य संशयित असून हत्या करुन तो फरार झाला आहे.

    हैदराबाद : पाच दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेह(Dead Body) सापडला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. एसव्हीआआर या सरकारी रुग्णालयाच्या शेजारी जळलेल्या अवस्थेत हैदराबादमधील(Hyderabad) एका २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणामध्ये महिलेचा पती मुख्य संशयित असून हत्या करुन तो फरार झाला आहे.

    मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणं अशक्य होते. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने सुटकेस टाकण्यासाठी मदत घेतलेल्या टॅक्सीचा शोध घेतला आणि या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

    पोलिसांनी टॅक्सी चालकाकडे चौकशी केली असता त्याने पीडित तरुणीचं नाव भुवनेश्वरी असुन ती चित्तोरची रहिवासी असल्याची माहिती मिळाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी तरुणी हैदराबाद येथे कामाला होती. २०१९ मध्ये श्रीकांत रेड्डी यांच्यासोबत तिचं लग्न झालं होतं. या दोघांना १८ महिन्यांनी मुलगीदेखील आहे.

    कोरोनामुळे श्रीकांतची नोकरी गेली. त्यानंतर दांपत्य तिरुपतीमध्ये राहण्यास आलं. नोकरी गेल्याने त्रस्त असलेल्या श्रीकांतने दारू प्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. दरम्यान २२-२३ जूनच्या रात्रीदेखील दोघांमध्ये भांडण झालं आणि यावेळी श्रीकांतने भुवनेश्वरीची हत्या केली. त्याने टॅक्सीच्या सहाय्याने मृतदेह लपवलेली सुटकेस रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये टाकून दिली. यानंतर रात्री तो पुन्हा आला आणि पेट्रोल टाकून सुटकेसला आग लावली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांतने आपल्या कुटुंबाला आणि सासरच्यांना डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचंही त्याने सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी तपास करत टॅक्सी चालकाच्या सहाय्याने गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान पोलिसांनी फरार श्रीकांतला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत.