Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

याचिका दाखल करणारी महिला नर्स असून तिचे एका घटस्फोटित पुरुषासोबत लग्न झाले आहे. तिच्या पतीला आधीच दोन मुले आहेत. ती पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अँड रिसर्चमध्ये कामाला होती. सदर महिलेचे हे पहिलेच लग्न आहे. महिला गरोदर राहिल्यानंतर तिने प्रसूतीची तारीख जवळ येताच रुग्णालयातून प्रसूतीच्या सुटीसाठी अर्ज केला. मात्र, रुग्णालयाने तिचा हा अर्ज फेटाळून लावला व तिची रजा नामंजूर केली.

    चंदीगड : तिसऱ्या अपत्यासाठी भरपगारी प्रसूती रजा मिळणार नाही, असे सांगत पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एका महिलेचा रजेसाठीची याचिका फेटाळून लावली आहे. या महिलेच्या पतीला पहिल्या लग्नातून दोन मुले आहे. त्यामुळे कायद्यानुसार हे तिचे तिसरे बाळ असून तिला त्याच्यासाठी प्रसूती रजा लागू होत नाही.

    याचिका दाखल करणारी महिला नर्स असून तिचे एका घटस्फोटित पुरुषासोबत लग्न झाले आहे. तिच्या पतीला आधीच दोन मुले आहेत. ती पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अँड रिसर्चमध्ये कामाला होती. सदर महिलेचे हे पहिलेच लग्न आहे. महिला गरोदर राहिल्यानंतर तिने प्रसूतीची तारीख जवळ येताच रुग्णालयातून प्रसूतीच्या सुटीसाठी अर्ज केला. मात्र, रुग्णालयाने तिचा हा अर्ज फेटाळून लावला व तिची रजा नामंजूर केली.

    रुग्णालयाच्या या निर्णयाविरोधात नर्सने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात तिने तिचे हे पहिलेच मूल असल्याचे न्यायालयाला सांगितले. याबाबत रुग्णालयाने न्यायालयाला सांगितले की सदर महिलेने तिच्या नवऱ्याच्या दोन्ही मुलांचे नाव तिच्या रेकॉर्डला जोडले आहे. त्यांच्या संगोपनासाठी तिने अनेकदा रजा घेतल्या आहेत तसेच त्यांच्या उपचारांचा खर्चही अनेकदा रुग्णालयातून घेतला आहे.