उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास प्रियंका गांधी बनणार मुख्यमंत्री? काँग्रेसनेते सलमान खुर्शीद म्हणतात

पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे, काही राजकीय पक्ष दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी व काही पक्ष आहे ती सत्ता टिकवण्यासाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक 2022 होणार आहे.

    उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक 2022 होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस देखील यात मागे नाहीय. त्यासाठी आता काँग्रेसचे सर्वच नेते कामाला लागले आहेत.

    याच संदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी प्रयागराजमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रियंका गांधी आमच्या नेत्या आणि पक्षाचा चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका लढल्या जातील. मुख्यमंत्री व्हायचे की नाही हे प्रियांका स्वत: ठरवतील. यावेळी यूपी एक नवीन अध्याय लिहिणार आहे. काँग्रेस अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकेल.”

    शनिवारी प्रयागराजमध्ये आलेल्या सलमान खुर्शीद यांनी यूपी आणि केंद्र सरकारला घेराव घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही. म्हणाले की, “जनतेची फक्त फसवणूक केली जात आहे. रोजगाराच्या नावाखाली बेरोजगारी वाढत आहे. महिलांवर वारंवार अत्याचार होत आहेत. एका विशिष्ट जातीला भुरळ घालण्याच्या प्रश्नावर माजी मंत्री म्हणाले की, काँग्रेसने कधीही जाती समाजाचे राजकारण केले नाही.”

    प्रयागराजसह इतर शहरांमध्ये बसपाच्या ब्राह्मण अधिवेशनावर ते म्हणाले की, असे लोक केवळ मतांचे राजकारण करतात. काँग्रेस राज्यभर फिरून झोपडपट्टीवासीयांच्या समस्या जाणून घेत आहे आणि समजून घेत आहे. गरीब आणि असहाय लोकांच्या समस्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील.

    दरम्यान, पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे, दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी व आहे ती सत्ता टिकवण्यासाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.