rajnikant

सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

हैद्राबाद : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांना तीव्र रक्तदाबाचा त्रास झाल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या काही आरोग्य चाचण्याही करण्यात आल्या.

रुग्णालयात त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता त्यांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. परंतु अन्नाथे (Annaatthe) या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना २२ डिसेंबरला रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.

यानंतर शुक्रवारी रुग्णालायात दाखल झाल्यानंतर पून्हा एकदा त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. कोव्हिड-१९ची कोणतीही लक्षण त्यांना आढळून आली नाहीत.