In Shajapur district of Madhya Pradesh, a husband built a 'wife's temple'

भारत हा मंदिरांचा देश असल्याचे म्हटल्या जाते. हजारो मंदिरे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. लोक सामान्यपणे देवी-देवतांची मंदिरे उभारतात. महापुरुषांची मंदिरे उभारतात. मात्र, मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यात एका पतीने चक्क 'पत्नीचे मंदिर' बनवले. घराच्या बाहेर बांधलेल्या या मंदिरात पतीने त्याच्या दिवंगत पत्नीची तीन फूट उंचीची बसलेली प्रतिमा स्थापन केली.

    भोपाळ : भारत हा मंदिरांचा देश असल्याचे म्हटल्या जाते. हजारो मंदिरे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. लोक सामान्यपणे देवी-देवतांची मंदिरे उभारतात. महापुरुषांची मंदिरे उभारतात. मात्र, मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यात एका पतीने चक्क ‘पत्नीचे मंदिर’ बनवले. घराच्या बाहेर बांधलेल्या या मंदिरात पतीने त्याच्या दिवंगत पत्नीची तीन फूट उंचीची बसलेली प्रतिमा स्थापन केली.

    महिलेची मुले दररोज आईचे दर्शन घेऊन तिला आठवतात. ग्राम सांपखेडा येथील रहिवाशी बंजारा समाजाचे नारायण सिंह राठोड आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. परिवारात सगळे काही सामान्य सुरू होते. पण नारायण सिंहची पत्नी गीताबाई धार्मिक कार्यक्रमांमध्ये जास्त व्यस्त राहत होती. ती भजन-कीर्तन करून दररोज भक्तीत विलिन राहत होती. अशात परिवारातील मुले आपल्या आईला देवी प्रमाणे समजत होते. पण कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गीताबाईंची तब्येत बिघडू लागली होती. डॉक्टरांनी चेक केले कर गीताबाई यांचे ब्लडप्रेशर वाढत आहे. गीताबाईचा मुलगा संजयने सांगितले की, डॉक्टरांनी आईवर उपचार केले, पण तिची तब्येत बरी होऊ शकली नाही. उपचारावर लाखो रुपये खर्च केल्यावरही डॉक्टर गीताबाईचा जीव वाचवू शकले नाहीत आणि त्यांचे निधन झाले.

    नेहमीच आईच्या सावलीत राहणाऱ्या मुलांना आईचे जाणे सहन झाले नाही. अशात वडील नारायणसिंह यांच्यासोबत चर्चा केल्यावर वडील आणि मुलांनी मिळून गीताबाईची प्रतिमा स्थापित करण्याचा निर्णय घेतला. गीताबाईचा मुलगा संजयने सांगितले की, आई गेल्यावर संपूर्ण परिवार तुटला. अशात सर्वांनी आईची प्रतिमा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अलवर राजस्थानच्या कलाकारांना आईची प्रतिमा बनवण्याची ऑर्डर दिली.

    साधारण दीड महिन्यांनंतर प्रतिमा तयार झाली. संजयने सांगितले की, आईची प्रतिमा तयार झाल्यानंतर जेव्हा प्रतिमा घरी आणली तेव्हा दिवस प्रतिमा घरात ठेवली. त्यानंतर घराच्या दारात त्यांनी एक मंदिर तयार केले आणि त्या ही प्रतिम स्थापन केली. संजय म्हणाला की, आता रोज सकाळी उठून ते आईची प्रतिमा बघतात. आता आई केवळ बोलत नाहीये. पण ती आमच्यासोबत नेहमीच आहे.